अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ


नवी दिल्ली – अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आल्यामुळे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामन्यांचं किचन बजेट आता आणखी कोलमडणार आहे.

२.७१ पैसे अनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर ५५.५० पैशांनी विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. एलपीजीच्या आंतराष्ट्रीय दरात वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेल्या घसरणीमुळे ही वाढ करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून दिल्लीत अनुदानित सिलेंडरच्या दरात ही दरवाढ लागू होणार आहे.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधन कंपन्या मागील महिन्याचे सरासरी दर आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाची किंमतीवर दरवाढ अवलंबून असते. विनाअनुदानित सिलेंडरचे दर हे जीएसटीमुळे किंमती वाढल्या आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात सिलेंडरचे दर वाढल्यामुळे विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात ५५.५० रुपये वाढ झाली आहे.

Leave a Comment