युधिष्ठिराने स्थापलेले सिद्धपीठ श्री बगलामुखीमाता मंदिर


देशभरात आज माता धूमावती जयंती साजरी केली जात आहे. ती तंत्र देवता मानली जाते. देशात अनेक ठिकाणी या देवीची मंदिरे आहेत मात्र त्यातील उज्जैनजवळ नालखेडा येथे असलेले बगलामुखी माता मंदिर तीन सिद्धपीठापैकी एक असून हे अतिप्राचीन मंदिर आहे. बगलामुखी मातेचेच दुसरे नाव धूमावती आहे. या देवीची पूजा अर्चा प्रामुख्याने मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच संकट रक्षणासाठी केली जाते. नालखेडाचे मंदिर स्मशानातच बांधले गेल्याचे सांगतात. विशेष म्हणजे या देवीच्या दर्शनाला अनेक बडे राजकीय नेते येतात. पंतप्रधान मोदी याचे भाऊ प्रल्हाद यांनी मोदींच्या यशासाठी येथे पूजा केल्याचे सांगितले जाते.


या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे राजा युधिष्ठिराने ते बांधले आहे. महाभारत काळात श्रीकृष्णाने विजय प्राप्तीसाठी या देवीची स्थापना करण्यास युधिष्ठिराला सांगितले होते. १८१५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. या देवीची तंत्र मंत्र साधना केली जाते. मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू असून ती तीन मुखी आहे. हे त्रिशक्तीचे प्रतिक मानले जाते. लखुंदर नदीकाठी हे मंदिर असून अत्यंत चमत्कारी मंदिर मानले जाते.

या मंदिरात धूमावती सह हनुमान, लक्ष्मी, कृष्ण, भैरव, सरस्वती याच्याही मूर्ती आहेत. नवरात्रात येथे भाविकांची अलोट गर्दी होते. मंदिर परिसर अतिशय सुंदर असून येथे अनेक प्राचीन वृक्ष दिसतात तसेच भोवती हिरवागार बगीचा आहे.

Leave a Comment