वाहतूकदारांचा २० जुलैला देशव्यापी संप


नवी दिल्ली : सध्या दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच असल्याने देश भरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज सलग १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल २० पैशांनी वाढले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८६ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. तर डिझेल ७३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दरवाढ जर अशीच सुरु राहिली तर १०० रुपयांच्या घरात पेट्रोल-डिझेलच्या किमती जातील, अशी भीती व्यक्त होत आहे.

मुंबईत पेट्रोलने ८५ रुपयांची पातळी ओलांडली. शहरात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटरला ३० पैशांची वाढ होऊन तो ८५.३३ रुपयांवर गेला असल्यामुळे महागाईला निमंत्रण मिळाले आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. वाहतूक व्यवस्थेवर पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे परिणाम होत आहे. या दरवाढीमुळे ट्रक व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस व्यवसायावर परिणाम झाल्याने येत्या २० जुलैला देशभरात संप पुकारणार आहे.

Leave a Comment