नॉर्वेमध्ये पुढचे दोन महिने होणार नाही रात्र


रात्र नाही नुसता अखंड दिवस अशी कल्पना आपण करू शकत नाही. नॉर्वे याठिकाणी मात्र चोवीस तासाचा दिवस अनुभवता येतो आणि ते दिवस आता आले आहेत. नॉर्वे मध्ये मे ते जुलै असे ७६ दिवस सूर्य मावळणार नाही तर तेथे चोवीस तास सूर्य दिसेल, म्हणजे या पुढचे दोन महिने नॉर्वेवासीय रात्रीशिवाय काढणार आहेत.

नॉर्वेला मध्यरात्रीचा सूर्य दिसणारा देश म्हणून ओळखले जाते. हा देश आर्कटिक सर्कल जवळ आहे. आपल्याला माहिती आहे कि पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि हि प्रदक्षिणा करायला तिला ३६५ दिवस लागता. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि हि प्रदक्षिणा ती १ दिवसात पूर्ण करते. त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते. सूर्याभोवती फिरताना पृथ्वी ६६ अंशाचा कोन करून फिरते आणि यावेळी पृथ्वीचा कक्ष झुकलेला असतो. यामुळे दिवस आणि रात्र लहान मोठे असतात.


नॉर्वे मध्ये मे ते जुलै या काळात जमिनीचा पूर्ण भाग सूर्यप्रकाशात असतो. येथे सूर्य मावळत नाही तर क्षितिजाला समांतर राहतो आणि पुन्हा वर आकाशात चढताना दिसतो. याच काळात येथे रंगीबेरंगी प्रकाश पाहायला मिळतो. त्याला नॉर्दन लाईट्स असे म्हटले जाते. हा अद्भुत नजारा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येतात.

Leave a Comment