आयकर परतावा भरताना केलेली एखादी चूक येऊ शकते तुमच्या अंगलट


नवी दिल्ली – तुम्ही आयकर परतावा भरताना केलेली एखादी चूक तुमच्या अंगलट येऊ शकते. कर वाचवण्यासाठी तुम्ही जर खोटी माहिती देण्याचा विचार करत असाल तरीही तुम्हाला ते महागात पडू शकते. कारण तुम्ही जर असे काही करताना आढळल्यास तुमच्यावर कारवाई केली जाईल, त्याचबरोबर आमची नजर अशा लोकांवर असेल असा इशाराच आयकर विभागाने दिला आहे.

नोकरदार वर्गातील करदात्यांना आयकर विभागाने इशारा दिला असून कर वाचवण्यासाठी नोकरदार वर्गातील करदात्यांनी कमी कमाई दाखवून सूट मिळवण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल असा इशारा आयकर विभागाने दिला आहे. याबाबत आयकर विभागाच्या बंगळुरू येथील सेंट्रल प्रॉसेसिंग सेंटर (CPC) ने मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यामुळे फ्रॉड टॅक्स सल्लागारांच्या नादी कर वाचवण्यासाठी लागू नका असा सल्ला विभागाकडून देण्यात आला आहे. विविध कलमांतर्गत आणि प्राप्तिकर अधिनियमाच्या खटल्यातील तरतुदींनुसार परतावा भरताना कमाई कमी दाखवणं किंवा वाढवून दाखवणे दंडनीय अपराध असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment