‘ट्राय’च्या नव्या वेबसाईटवर सर्व कंपन्यांचे प्लॅन


मुंबई : सर्व दूरसंचार कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनची माहिती ग्राहकांना आता एकाच ठिकाणी मिळणार असून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ने यासाठी नवी वेबसाईट लाँच केली असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.

वेगवेगळ्या टॅरिफ प्लॅन्सची माहिती ‘ट्राय’ची नवी वेबसाईट (http://tariff.trai.gov.in) वर डाऊनलोड करता येईल अशा फॉरमॅटमध्ये ती माहिती उपलब्ध आहे. ग्राहकांना यामुळे सर्व कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनशी तुलना करुन योग्य तो प्लॅन निवडता येईल, असे ‘ट्राय’ने म्हटले आहे. ग्राहकांना या वेबसाईटवर फिडबॅकही देता येईल. ग्राहक मोबाईल, लँडलाईन, प्रीपेड, पोस्टपेड आणि सर्कलनुसार ऑपरेटर्स निवडून आपला प्लॅन निवडू शकतात. दरम्यान, सध्या तरी या पोर्टलवर फक्त दिल्ली सर्कल दिसत आहे.

Leave a Comment