आता आरबीआय आणार ३५० रुपयाचे नाणे!


मुंबई : लवकरच ३५० रुपयांचे नाणे भारतीय रिझर्व्ह बँक जारी करणार असून आरबीआय ही नाणी गुरु गोविंद सिंह महाराज यांच्या ३५० व्या प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांसाठी बाजारात आणणार आहे. फारच कमी कालावधीसाठी ही नाणी जारी केली जाणार आहेत. आरबीआयकडून अशाप्रकारची नाणी खास निमित्तासाठी जारी केली जातात.

चांदी, तांबे, निकेल आणि झिंक धातूमिश्रित ३५० रुपयांचे हे नाणे ४४ एमएमचे असेल. अशोक स्तंभ नाण्याच्या पुढच्या भागात असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल. त्याचबरोबर नाण्याच्या दोन्ही बाजूंना इंग्लिशमध्ये इंडिया आणि देवनागरीत भारत लिहिलेले असेल. याच भागात रुपयाचे चिन्ह आणि मध्ये ३५० मुद्रीत असेल. तसेच नाण्याच्या मागील भागावर इंग्लिश आणि देवनागरीत श्री गुरु गोविंद सिंह यांचा ३५०वा प्रकाश उत्सव लिहिलेले असेल. यावर १६६६-२०१६ हे देखील मुद्रीत केलेले असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, नाण्याचे वजन ३४.६५ पासून ३५.३५ ग्रामच्या दरम्यान असेल. बाजारात किती नाणी जारी केली जाणार ह्याची माहिती आरबीआयने अद्याप दिलेली नाही.

Leave a Comment