तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य लवकरच एक लाख कोटी डॉलर्सवर पोहोचेल


वॉशिंग्टन – मायक्रोसॉफ्टसह तंत्रज्ञान क्षेत्रातील अन्य कंपन्यांचे बाजारमूल्य वर्षभरात १ लाख कोटी डॉलर्सची उंची गाठणार असे मॉर्गन स्टॅनले यांच्या अहवालात सांगण्यात आले आहे. कंपनीचा समभाग पुढील १२ महिन्यामध्ये १३० डॉलर्सवर पोहोचले असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या प्रतिसमभाग ९४ डॉलर्स असून सोमवारी त्यामध्ये ७ टक्क्यांनी वृद्धी झाली होती.

लवकरच एक लाख कोटी डॉलर्सवर अॅपल, गुगलची पालक कंपनी असलेली अल्फाबेट आणि अॅमेझॉन या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य पोहोचेल असे सांगण्यात आल्यानंतर त्यामध्ये आता मायक्रोसॉफ्टचाही समावेश झाला आहे. ७२२ अब्ज डॉलर्स मायक्रोसॉफ्टचे सध्याचे बाजारमूल्य असून, त्या बरोबरीत अॅपलची ८७६ अब्ज डॉलर्स, अॅमेझॉन ७५३ अब्ज डॉलर्स आणि अल्फाबेट ७३१ अब्ज डॉलर्स आहेत. कंपनीच्या क्लाऊड सेवेचे वाढते ग्राहक, मजबूत वितरण प्रणाली, उत्तम ग्राहक सेवा आणि उत्पन्नात वाढ होत असल्याने लवकरच कंपनीचे बाजारमूल्य लाख कोटी डॉलर्सवर पोहोचेल असे मॉर्गन स्टॅनलेने म्हटले. कंपनीची क्लाऊड सेवा विस्तारत आहे. मायक्रोसॉफ्टव्यतिरिक्त गुगल, अॅमेझॉन कंपन्यांकडूनही क्लाऊड सेवा देण्यात येत आहे.

Leave a Comment