फेसबुकच्या अडचणी वाढल्या; ‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’चे एफबीवरुन लॉगआऊट


न्यूयॉर्क – सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या अडचणी केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर वाढताना दिसत आहेत. फेसबुकवरील अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ या कंपन्याचे पेज बंद केले आहेत.

ट्विटरवर एका युजरने इलॉन मस्क यांना केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर फेसबुकवरील ‘स्पेस एक्स’चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. काही वेळातच मस्क यांनी देखील फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला दणका दिला. फेसबुकसोबत आम्ही कधीही जाहिरात केलेली नाही. आम्ही कोणाला आमची खोटी जाहिरात करण्यासाठी सांगत नाही किंवा आम्ही त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. आमच्या चांगल्या दर्जामुळेच माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही चालतात, असे त्यांनी सांगितले. कंपनीला फेसबुकवरील पेज डिलिट केल्याने मोठा फटका बसेल असे काही नसल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या फेसबुकवरील पेजला लाखो युजर्सनी लाईक केले होते. एखाद्या कंपनीने केंब्रिज अॅनालिटिकाप्रकरणानंतर फेसबुकवरील पेज बंद करण्याची ही पहिलीच घटना असून फेसबुकसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Comment