स्वस्त चीनी कार्सनी सजणार भारतीय बाजार


चीनमधून येणाऱ्या स्वस्त खेळणी, फोन, इलेक्ट्रोनिक आणि इलेक्ट्रिस वस्तूंनी भारतीय बाजारावर केलेले आक्रमण ओसरण्याअगोदरच आता चीनी वाहन उद्योग भारतीय बाजारवर चाल करून येण्यास सज्ज झाला आहे. चीनी ऑटो कंपनी एसएआयसी मोटर्स भारतात २०२५ पर्यंत ५ हजार कोटी डॉलर्सची गुत्वणूक करत असून २०१९ मध्ये मॉरीस गॅराजेस ब्रांड त्यांच्या कार्स भारतीय बाजारात विक्रीसाठी आणत आहे. हा ब्रांड ब्रिटीश असला तरी १० वर्षापूर्वी एसएआयसीने तो नॅनजिंग ऑटो कडून खरेदी केलेला आहे.

रॉयटरने दिलेल्या बातमीनुसार चायना असो. ऑफ ऑटो मॅन्यूफॅक्चरर्सच्या म्हणण्यानुसार चीन मधील वाहन विक्री थोडी सुस्तावली असून त्यामानाने भारतात प्रवासी वाहन विक्रीचा बाजार वेगाने वाढतो आहे. २०२० पर्यंत हा बाजार जगातील तीन नंबरचा मोठा बाजार असेल. २०१६ मध्ये चीनने भारतात २७.८ कोटी डॉलर्स एफडीआय आणला असून त्यातील ६० टक्के ऑटो क्षेत्रात आहे.

अर्थात वाहन बाजारात चीनला स्पर्धा सोपी नाही. विश्वास, गुणवत्ता आणि विक्री बरोबरच विक्री पश्चात सेवा महत्वाची ठरणार आहे. सध्या भारतीय बाजारावर मारुतीचा दबदबा आहे. भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि चीनी कंपनीसाठी हाच महत्वाचा रस्ता ठरणार आहे. इलेक्ट्रिक कार तंत्रज्ञान क्षेत्रात चीनने मोठी आघाडी घेतली असून चीन हा इलेक्ट्रिक कारचा जगातला मोठा बाजार बनला आहे.

Leave a Comment