इंटरनेटच्या दुनियेत आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत जिओ


नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओ लॉन्च करून रिलायन्सने धमाका केला. आता पुन्हा एकदा रिलायन्स जिओ इंटरनेटच्या दुनियेत धमाका करण्याच्या तयारीत असून जिओ आता आपले लो कॉस्ट ब्रॉड ब्रॅंड नेटवर्क जिओ फायबर (Jio Fiber) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. देशातील कोट्यावधी लोकांना जिओच्या या सेवेचा फायदा मिेळेल. तसेच यामुळे ब्रॉडब्रॅँड सेक्टरच्या कंपन्यांना जबरदस्त टक्कर मिळेल.

याबाबत मिळालेल्या महितीनुसार रिलायन्स जिओ फायबरच्या तर्फे अत्यंत स्वस्त दरात १ जीबिपीएसची हायस्पीड ब्रॉडब्रॅंड सेवा सादर करण्यात येईल. एका टेक वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, मार्चच्या शेवटापर्यंत जिओ फायबर लॉन्च होईल. पण कंपनीने यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये रिलायन्स जिओने टेलीकॉम सर्विस सुरु केली. त्यानंतर टेलिकॉम विश्वास धमाका झाला. त्यानंतर स्वस्त डेटा, व्हाईस कॉलची सुविधा सुरू केली.

या टेक वेबसाईटने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार सध्या ही सेवा सुरत, मुंबई, अहमदाबाद, वडोदरा, दिल्ली एनसीआर, हैद्राबाद आणि जामनगर १० मोठ्या शहरात मिळेल. याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर त्याचा अधिक विस्तार करण्यात येईल. वर्षअखेरीस पर्यंत कंपनी जिओ फायबरची सुविधा ३० शहरात सुरु करतील.

Leave a Comment