चक्क कार्टूनसारखी दिसते ही दोन मुलांची आई


अमेरिकेची रहिवाशी असलेली डियाना रिंगो ही दोन मुलांची आई असून अमेरिकेच्या नौसेनेत कार्यरत होती. पण आता आम्ही तुम्हाला डियानाबद्दल का सांगत आहोत? त्याला एक विशेष कारण आहे. डियानाला पाहाणारा प्रत्येक व्यक्ती थक्क झाल्याशिवाय रहात नाही. जगभरात तिच्या १८ इंची कंबरेची चर्चा आहे. लोक डियाना हिची तुलना थेट कार्टून कॅरेक्टरसोबत करत आहेत. पण तिच्या १८ इंचाच्या कंबरेमागे धक्कादायक कहाणी लपली आहे.


अमेरिकेच्या सैन्यातही डियाना हिने काम केले आहे. ती सुरुवातीला तंदुरुस्त होती. मात्र, तिने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर फिगर मेंटेन करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत कठीण एक्सपेरिमेंट देखील तिने शरीराला आकार देण्यासाठी केले. ती मागील ३ वर्षांपासून कंबरेला घट्ट बॅंड चढवते. त्यामुळे तिची कंबर १८ इंचाची झाली आहे. ती कंबरेचा बॅंड जेवण करताना तसेच झोपतानाही काढत नाही. डियानाच्या कंबरेवरील कॉरसेट बॅंड पाहून तिला कुटुंबातील लोक कायम टोमणे मारत होते. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या फिगरवर डियाना जाम खूश आहे.

Leave a Comment