हातांना दुर्गंधी येत आहे का? मग त्यासाठी करा हे उपाय


स्वयंपाक करताना किंवा उग्र वास असणाऱ्या वस्तू हाताळताना त्या वस्तूंचा किंवा पदार्थांचा वास हातांना राहतो. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवूनही हातांची दुर्गांची कमी होत नाही. विशेषतः कांदे, लसूण, किंवाकच्च्या मांसाहारी पदार्थांचा वास हातांमधून लवकर जात नाही. ही दुर्गंधी घालविण्यासाठी काही साधे उपाय करता येतील. मिठामुळेहातांची दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते. हातांना दुर्गंधी येत असल्यास हात थोडे ओलसर करून घ्यावे आणि त्यावर थोडे मीठ टाकून हात एकमेकांवर चोळावेत. दोन मिनिटे हात मिठाने चोळल्यानंतर हात पाण्याने स्वच्छ धुवावेत.

हातांना दुर्गंधी येत असल्यास लिंबाची साल हातांवर चोळावी, किंवा लिंबाचा रस हातांना चोळावा, संत्र्याचा रस हातांना चोळल्याने देखील हातांची दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते. तसेच व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याच्या मिश्रणाने हातांची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.एका वाटीमध्ये थोडेसे व्हिनेगर घेऊन त्यामध्ये बेकिंग सोडा घालून त्याची पातळसर पेस्ट बनवावी, आणिही पेस्ट हातांवर चोळावी. मासे, कांदेकिंवा लसूण हाताळल्याने हातांना येणारी दुर्गंधी या पेस्टमुळे निघून जाते.

हातांची दुर्गंधी घालविण्यासाठी कॉफीची पूड हातांवर चोळावीव त्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. तसेचटूथपेस्ट चा उपयोग केवळ दात स्वच्छ करण्यासाठीच नव्हे, तर हातांची दुर्गंधी घालविण्यासाठी देखील होतो. हातांना दुर्गंधी येत असल्यास थोडी टूथपेस्ट हातांना चोळावी. त्यानंतर हात पाण्याने स्वच्छ धुवावेत. मात्र हातांची दुर्गंधी घालविण्यासाठी टूथपेस्ट वापरणार असाल, तर पांढरी टूथपेस्ट वापरा. जेल टूथपेस्ट तितकीशी उपयोगी ठरणार नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment