गाढ झोप येण्यासाठी करा हे उपाय


रात्रभर तुम्ही सतत कूस बदलत राहत असाल, झोप लागत नसेल, किंवा लागलीच तर वारंवार झोपमोड होत असेल, तर अश्या वेळी झोप अपुरी राहल्याने दुसरा दिवस आळसात जातो. कोणत्याही कामाचे उत्साह वाटत नाही. रात्रभराची व्यवस्थित, गाढ झोप, शारीरिक आणि मानसिक थकवा घालविण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. जर ही विश्रांती शरीराला मिळाली, तर शरीरामध्ये काम करण्याचा उत्साह राहतो, मेंदू सचेत राहतो आणि मानसिक तणाव देखील जाणवत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तींना रात्री झोप लागण्यास त्रास होत असेल, त्यांनी काही उपायांचा अवलंब केल्यास फायदा होऊ शकतो.

आपण ज्या खोलीमध्ये झोपत असू, तिथे जर सतत कोणते ना कोणते आवाज येत असतील, किंवा बाहेरील प्रकाश जर अत्त खोलीमध्ये येत असेल, तर झोपमोड होत राहण्याची शक्यता असते. अश्या वेळी आपल्या खोलीमध्ये बाहेरील आवाज किंवा प्रकाश येणार नाही, किंवा कमी येईल अशी व्यवस्था करण्याची गरज आहे. तसेच तुमच्या जोडीदाराच्या सततच्या घोरण्याच्या सवयीमुळे वारंवार झोपमोड होत असेल, तर त्यावर घोरणे कमी होण्यासाठी बाजारामध्ये उत्पादने उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करता येईल.

शांत आणि गाढ झोप येण्याकरिता आजकाल मेमरी फोम गाद्या खूपच लोकप्रिय होत आहेत. या गाद्यांमुळे पाठीच्या कण्याला आधार मिळतो. तसेच स्लीप मास्क च्या वापरामुळे खोलीतील किंवा खोली बाहेरील प्रकाशाचा त्रास होऊन झोपमोड होणार नाही. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधाचे सेवन केल्यासही शांत झोप येणास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment