जेट विमानात जन्म- आयुष्यभर मोफत प्रवासाची भेट


जेट एअरवेज च्या सौदीहून भारतातील कोची येथे येणाऱ्या विमानात एका महिलेची मुदतपूर्व प्रसूती होऊन बाळाचा जन्म झाल्याची घटना या विमान कंपनीच्या इतिहासात प्रथमच घडली. विमान कंपनीने या घटनेबद्दल आनंद व्यक्त करताना नवजात बाळाला आयुष्यभर जेट विमानातून मोफत प्रवास करण्याची सुविधा दिल्याचे जाहीर केले आहे. या बाळाचा जन्म विमान अरबी समुद्रावरून ३५ हजार फुटांवरून उडत असताना झाला.

मिळालेल्या माहितीनुसार सौदी येथून ९ डब्ल्यू ५६९ या फ्लाइट मधून प्रवास करणाऱ्या २९ वर्षीय सी जोझ या महिलेला विमानातच मुदतीपूर्वी प्रसूती वेदना होऊ लागल्या. वैमानिकांनी कुणी डॉक्टर आहे का याची चौकशी केली मात्र सुटीसाठी घरी चाललेल्या एका नार्सेने पुढाकार घेऊन जोझ चे बाळंतपण केले. परिस्थिती लक्षात घेऊन विमान मुंबईला आणले गेले व बाळबाळंतीणला होली क्रॉस हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले. त्या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. या नंतर विमान कोची कडे रवाना झाले. या साऱ्या गडबडीत विमानाला ४५ मिनिटे उशीर झाला पण कुणीही प्रवाशाने त्याबद्दल तक्रार केली नाही.
————

Leave a Comment