सुनिल मित्तल समाजसेवेसाठी दान करणार ७ हजार कोटी रूपये


नवी दिल्ली : सामाजिक कामांसाठी आपल्या एकूण संपत्तीतील १० टक्के भाग म्हणजे तब्बल ७ हजार कोटी रूपये दान करण्याची घोषणा टेलिकॉम कंपनी एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी केली आहे.

त्यांनी या शिवाय एअरटेलमधील आपले ४ टक्के शेअर्सही सामाजिक कामांच्या खर्चासाठी दिले आहेत. सुनील मित्तल यांनी दुर्बल आणि वंचित समाज घटकांमधील तरूण-तरूणींना मोफत शिक्षण घेता यावे म्हणून ‘सत्य भारती विश्वविद्यापीठ’स्थापन करण्याची घोषणाही केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विशेष लक्ष सत्य भारती विश्वविद्यापीठात केंद्रीत केले जाणार आहे. येथे अर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि समाजातील वंचित विद्यार्ध्यांना मोफत शिक्षण देण्याची सुविधा करण्यात येणार आहे.

Leave a Comment