आता पेट्रोलशिवाय धावणार रस्त्यावर टाटाची नवी नॅनो


नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो पुन्हा येत असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आपली नॅनो कार पुन्हा लॉन्च करण्याची तयारी टाटाने पूर्ण केली आहे. टाटा नॅनो येत्या २८ नोव्हेंबर रोजी पुन्हा लॉन्च करण्यात येणार आहे.

यावेळी टाटाच्या नॅनो कारचे नाव बदलून जायेम नियो असे ठेवत लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाटाच्या नव्या जायेम नियो कारचे लॉन्चिंग होणार आहे.

इलेक्ट्रिक वर्जनसह (EV) नवी टाटा नॅनो बाजारात लॉन्च केली जाणार आहे. टाटा मोटर्स आणि कोयंम्बतूर येथील जायेम ऑटोमोटिव्ह कंपनीसोबत इलेक्ट्रिक कारसाठी हातमिळवणी केली आहे. इकोनॉमिक्स टाईम्सच्या मते, कारची बॉडी जायेम मोटर्स तयार केल्यानंतर कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर फिट करण्यात आले आहे. बाजारात इलेक्ट्रॉनिक कार आल्याने प्रदूषणाची समस्या दूर होण्यास मदत होईल.

ओलाकडून टाटा मोटर्सला ४०० इलेक्ट्रिक नॅनो कारची ऑर्डर यापूर्वीच मिळाली आहे. जायेम नियो इलेक्ट्रॉनिक कारला फुल चार्ज केल्यानंतर १४० किमी चालवता येणार आहे. इलेक्ट्रिक सिस्टमवर चालणारी ही कार १७ Kw (२३ hp) जनरेट करेल. केवळ कमर्शिअल वापरासाठी टाटा नॅनो कारचे हे इलेक्ट्रिक वर्जन बाजारात येत आहे. पण अद्याप यासंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.

Leave a Comment