मुकेश अंबानींच्या कुटुंबीयांकडे २.९१ लाख कोटींची मालमत्ता


नवी दिल्ली- आशियातील सर्वात श्रीमंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे कुटुंब ठरले असून अंबानी कुटुंबीयांकडे आंतरराष्ट्रीय मासिक फोर्ब्जनुसार २.९१ लाख कोटींची मालमत्ता आहे. यात मागील वर्षीच्या तुलनेत ७४ टक्के म्हणजेच १.२३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आशियातील ५० सर्वात श्रीमंत कुटुंबीयांची यादी फोर्ब्जने जारी केली. ४५.४३ लाख कोटी रुपये यांची एकूण संपत्ती आहे. यात वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ३५ टक्के वाढ झाली आहे.

२.६५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियातील ली परिवार आहे. कोरियातील सर्वात मोठी कंपनी सॅमसंगचे हे कुटुंब संचालक आहे. वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये ७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ७२,८०० कोटी म्हणजेच २८ टक्के वाढ कुटुंबीयांचे नेटवर्थमध्ये झाली आहे. मागील वर्षी १.९२ लाख कोटी रुपये नेटवर्थसह ली कुटुंबीय आशियातील सर्वात श्रीमंत होते.

पहिल्यांदाच या यादीत भारतातील सहगल (टीएसजी) आणि वाडिया यांच्यासह सहा परिवारांचा समावेश झाला आहे. ४०,००० कोटींच्या नेटवर्थसह सहगल कुटुंबीय ४१ व्या व एवढ्याच संपत्तीसह वाडियाही ४२ व्या क्रमांकावर आहे. ४३ कुटुंबीयांच्या संपत्तीमध्ये २०१६ च्या तुलनेत वाढ झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजीच्या शेअरच्या किमतीवर आधारित फोर्ब्जची ही आकडेवारी आहे.

Leave a Comment