चार हजार शस्त्रांचा मालक बर्नस्ट्रेन

अमेरिकेतील मेल बर्नस्ट्रेन या माणसाची ओळख वन मॅन आर्मी तसेच ड्रॅगन मॅन अशी आहे. याचे कारण म्हणजे जगात सर्वाधिक शस्त्रे मालकीची असणारा तो एकमेव माणूस असून त्याच्याकडे चार हजारांहून अधिक शस्त्रे आहेत. त्याच्या मालकीचे ड्रॅगन आर्म्स नावाचे शस्त्रांचे दुकान असून त्यात एकापेक्षा एक आधुनिक बंदुका, पिस्तुले, रायफल्स, मशीनगन्स अशी शस्त्रे आहेत.

इतकेच नव्हे तर त्याच्या मालकीच्या सहा शूटिंग रेंजस आहेत. तसेच पेंटबॉल पार्क, मोटरक्रॉस पार्कही आहे. त्याने नुकत्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की अमेरिकेतील लास वेगास येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्याकडच्या शस्त्रविक्रीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यात विकली गेली नाहीत इतकी शस्त्रे या काळात विकली गेली आहेत. अमेरिकेतील ३ टक्के नागरिकांकडे २६ कोटींपेक्षा जादा गन्स आहेत. याचाच अर्थ या ३ टक्कयातील प्रत्येक नागरिकाकडे सरासरी १७ पेक्षा जास्त बंदुका आहेत. अमेरिकन कायद्याप्रमाणे कुणीही नागरिक येथे शस्त्रखरेदी करू शकतो.

Leave a Comment