डाव्या हातावरच का बांधले जाते घड्याळ ?


कुणीही उजव्या हाताचाच वापर जास्तीत जास्त काम करण्यासाठी करतात. काही क्वचितच लोक असतात जे डाव्या हाताने सर्वकाही करतात. पण घड्याळ घालण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा आपोआपच डावा हात पुढे केला जातो. डाव्या हातावरच घड्याळ का बांधले जाते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का ? नाही ना? पण अनेकांना हा साधा तितकाच उत्सुकतेचा प्रश्न पडला असेल की,असे का? तर आम्ही करतो आहे त्याचा खुलासा…

पूर्वीच्या काळात घड्याळ बांधण्याचा ट्रेन्ड नव्हता तर घड्याळ खिशात घेऊन फिरण्याचा ट्रेन्ड होता. त्यानंतर घड्याळांच्या डिझाईनमध्ये हळूहळू बदल होत गेल्यामुळे त्या ठेवण्याच्याही अडचणी येऊ लागल्या. खिशात ठेवल्याने त्या तुटू लागल्यामुळे हळूहळू घड्याळ हातात बांधण्याचा ट्रेन्ड सुरू झाला. त्यावेळी सरळ हातात उलट्या हाताने घड्याळ बांधणे एक टिपिकल काम असायचे.

लोकांनी अशात एक शक्कल लढवली आणि डाव्या हातात घड्याळ बांधायला सुरूवात केली. डाव्या हातात उजव्या हाताने घड्याळ बांधणे जरा सोपे काम आहे आणि सहज ते होऊ शकते. पण उजव्या हातात डाव्या हाताने घड्याळ बांधणे तसे कठीणच. यासोबतच याचे आणखी एक कारण आहे. काही लोकांना सोडले तर जास्तीत जास्त लोक हे उजव्या हातानेच सर्व कामे करतात. त्यामुळे घड्याळ त्या हातात बांधल्याने ते बघायलाही अडचण व्हायची. त्यामुळे डाव्या हाताचाच घड्याळ बांधण्यासाठी जास्त वापर होऊ लागला. आजही जास्तीत जास्त लोक हे डाव्या हातात घड्याळ बांधतात. पण असेही काही लोक आहेत जे उजव्या हातात घड्याळ घातलेले बघायला मिळतात.

Leave a Comment