सुझुकीची नवी स्विफट स्पोर्ट सादर


जपानी कार निर्माती कंपनी सुझूकीने नवी सुझुकी स्विफ्ट स्पोर्टस टोक्यो मोटर शो २०१७ मध्ये सादर केली आहे. २०१७ च्या फ्रँकफर्ट मोटर शो मध्ये ती अनव्हिल केली गेली होती. भारतीय रूपयांत या कारची किंमत १०.४७ लाख ते ११.७० लाख दरम्यान असेल. ही कार भारतातही लाँच करण्याची तयारी कंपनीकडून केली जात आहे.

या कारसाठी १.४ लिटरचे के १४ सी बूस्टरजेट टर्बो चार्ज्ड फोर सिलींडर इंजिन दिले गेले आहे. तिला सिक्स स्पीड मॅन्यअल तसेच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असून ही कार जुन्या स्विफ्टपैक्षा हलकी आहे. ही कार लिटरला १६.४ किमीचे मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. या कारला ड्यूल सेंसर ब्रेक सपोर्ट, अॅडप्टीव्ह क्रूझ कंट्ोल सिस्टीम, एलईडी हेडलँप, सिरयर टेलगेट स्पॉयलर, ड्यूल एक्झॉस्ट सेटअप फिचर्स दिली गेली आहेत.

Leave a Comment