
नवी दिल्ली : महसूल खात्याचे सचिव हसमुख आधिया यांनी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या दरांमध्ये फेरबदलांची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले आहे.
जीएसटीच्या दरांमध्ये फेरबदलांची आवश्यकता : केंद्रीय महसूल सचिव
जीएसटीच्या दरांमुळे देशात सध्या मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्यामुळे जीएसटीच्या दरात बदल केल्यास छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांवरील कराचे ओझे कमी होण्यास मदत होईल. तसेच जीएसटी करप्रणालीमुळे निर्माण झालेली स्थिती स्थिरस्थावर होण्यासाठी एक वर्षभराचा अवधी द्यावा लागेल, असेही आधिया यांनी सांगितले आहे.
१० नोव्हेंबर रोजी गुवाहाटीत जीएसटी परिषदेची २३वी बैठक होणार आहे. हसमुख आधिया हे आपल्या सूचना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्त्वात पार पडणाऱ्या या बैठकीत मांडणार आहेत. ज्या सूचना आधिया मांडतील, त्या प्रत्यक्षात येणाऱ्या फिटमेंट कमिटी कसे काम करते, त्यावर अवलंबून आहे.
दरम्यान, ज्यावेळी जीएसटी स्थीर होण्यासाठी किती काळ जाईल असे आधियांना विचारल्यास, ते म्हणाले, आणखी एक वर्षाचा कालावधी लागेल. कारण सर्वांसाठी जीएसटी ही नवीन व्यवस्था आहे. आणखी एक वर्षाच्या कालावधीची आवश्यकता जीएसटी कर प्रणालीत सर्व बदलांसाठी आहे.
