जगातील पॉवरफुल स्पोर्टस कार अगेरा आर


स्वीडनच्या कोएनिगसेस कंपनीने सदर केलेली अगेरा आर ही जगातील महागडी, अतिवेगवान व दमदार हायब्रिड स्पोर्टस कार आहे. अगेरा रेाबोटाईज्ड कार या नावाची ही कार संपूर्णपणे कार्बन फायबरपासून बनविली गेली आहे. अतिशय आरामदायी व शानदार लूक असलेली ही कार प्रकाश पडला की एखाद्या हिर्‍याप्रमाणे लखलखते. कारवर जणू हिर्‍याचे कोटिंग चढविले असावे असा भास त्यामुळे होतो. या कारची किंमत १२ कोटी ४० लाख असून तिचा वरचा भाग फोल्डेबल आहे. दोन सीटर व दोन दरवाजे असलेली ही कार ० ते १०० किमीचा वेग फक्त २ सेकंदात घेते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ४१० किमी. २०१५ च्या जिनिव्हा शोमध्ये ती सादर केली गेली होती.

याच कंपनीची दुसरी स्पोर्टस कार ट्रेव्हिटा नावाने सादर केली गेली असून तिला ४८०० सीसीचे इंजिन दिले गेले आहे. या कारची किंमत ३२ कोटी ४३ लाख असून अशा फक्त तीनच कार कंपनी बनविणार आहे. त्यातील एक अमेरिकेचा मुष्टीयोद्धा मेवेदरकडे आहे. या कारच्या व्हिलवर हिरे बसवले गेले आहेत व तिचे इंटिरीयर अफलातून बनविले गेले आहे. या कारचा टॉप स्पीडही ताशी ४१० किमी आहे.

Leave a Comment