महिलावर्गासाठी उपयुक्त अॅपस


स्मार्टफोन हा आता प्रत्येकाची गरज बनला आहे. श्रीमंत गरीब, पुरूष महिला, मुले मुली कोणाकडेही पहा, प्रत्येकाच्या हातात फोन दिसतोच. त्यात स्मार्टफोनवर अनेक अॅप्सही उपलब्ध आहेत त्यातील कांही महिलांसाठी फारच उपयुक्त ठरू शकतात त्याची माहिती खास महिलावर्गासाठी

वायका ही वेबसाईट महिलांना त्यांच्या पसंतीची सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्यासाठी फार उपयुक्त आहे. स्कीन पासून हेअर,पर्सनल केअर पर्यंत सर्व माहिती येथे मिळतेच पण चांगले डील, डिस्काऊंटही येथे मिळू शकतो. येथे अनेक उत्पांदने बाजारभावापेक्षा कमी दरात मिळतात.

ग्रोफर्स- ग्रोसरी ऑनलाईन च्या या सुविधेमुळे रोजच्या रोज भाजी, किराणासाठी दुकानात हेलपाटे घालण्याची गरज राहात नाही. रोजच्या आवश्यक वस्तूंबरोबरच येथे इलेक्ट्रॅनिक्स, पेट केअर, स्टेशनरी, प्लॅस्टीकच्या गरजेच्या वस्तूही उपलब्ध आहेत.

स्नॅपसीड- फोटेा एडिटिंगसाठी सहाय्यकारी या अॅपमध्ये इफेक्ट, फिल्टर्सचे खूप ऑप्शन्स आहेत. त्यामुळे महिला स्वतःचे फोटो अधिक देखणे बनवू शकतात तेही अगदी सहजतेने.


पिरीयड ट्रॅकर- अनेकदा महिलांना आपल्या मासिक पाळीची वेळ लक्षात ठेवणे अवघड बनत असते. हे अॅप त्यासाठी तुमचे सहाय्य करते. मासिक पाळीच्या तारखेच्या दोन दिवस आधीच हे अॅप तुम्हाला रिमांयडर पाठविते.

नेटफ्लिकस- महिलांना अनेकदा मोकळा वेळ मिळाला की काय करायचे असा प्रश्न पडतो. अशावेळी नेटफ्लिक्स तुमची उत्तम करमणूक करू शकते. या अॅपवर अनलिमिटेड एंटरटेनमेंट उपलब्ध अ्रसून त्यात टिव्ही शोज, डॉक्युमेंटरी, फिल्मची रेलचेल आहे.

उबेर- सेफ्टी फिचर्ससह टॅक्सी सर्व्हीस देणारे हे अॅप महिलांसाठी प्रवास अधिक सोपा, सहज बनवू शकते. यातील शेअर युवर इटीए फिचर युजरचे लोकेशन मित्र, कुटुंबियांना सांगते त्याचबरोबर एसओएस ऑप्शन इमर्जन्सीसाठी उपयुक्त आहे.


प्राक्टो हे अॅप आणीबाणीच्या वेळी जवळपास डॉक्टर शोधण्यासाठी उपयुक्त आहे. जवळचे क्लिनिक, हॉस्पिटल यामुळे कळू शकते तसेच कॉल करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंटही बुक करू शकता.

हेल्दी लाईफ हे अॅप स्वतःच्या आरोग्याविषयी व फिटनेसविषयी अधिक जागृत असलेल्यांना फार उपयोगी आहे. हेल्दी राहण्याच्या टिप्स येथे मिळतीलच पण रोजचे तुमचे डाएटही हे अॅप मॉनिटर करेल.


लाफालाफा- टॉप डिल्सवर ट्रॅक ठेवण्याचे काम हे अॅप करते. कांही निवडक टॉप डील्स साईटची माहिती तसेच ऑनलाईनवर शॉपिंगसाठी भारी सूट देणार्‍या साईटची माहिती यावर मिळू शकते.

ट्रू कॉलर या अॅपमुळे तुम्हाला अननोन नंबरवरून कॉल आला असेल तर त्याचे डिटेल्स देते. कुठल्या राज्यातून फोन आला याची माहिती येथे मिळू शकते.

Leave a Comment