आता नुसते हसून भागवा रेस्टॉरंटचे बिल


पूर्व चीनमधील हांगझौ येथील एका रेस्टॉरंटने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर यशस्वीपणे करून घेतला आहे. यानुसार रेस्टॉरंटमधील पदार्थांचे बिल देताना ग्राहक स्माईल टू पे सिस्टीमसमोर उभा राहून केवळ हसला तरी त्याचे बिल अॅटोमॅटिक भरले जाणार आहे. यात फेशियल रेक्गनीझेशन तंत्रज्ञान वापरले गेले आहे. ज्या रेस्टॉरंटमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे ते युमेचन रेस्टॉरंट जगातील सर्वात मोठ्या फास्टफूड चेनचे आहे. युवक तसेच टेक सेव्हींकडून या बिल पद्धतीला विशेष पसंती दिली जात आहे.

या तंत्रज्ञानासाठी फेस पेमेंट सॉफ्टवेअर अलिबाबा समुहातील कंपनीने बनविले आहे. त्यानुसार ग्राहकाने ऑर्डरिंग किओस्कसमोर उभे राहून आता फोन नंबर एन्टर करायचा आहे. यामुळे सिस्टीमला गंडविण्याचा प्रकार करणार्‍यांपासून संरक्षण मिळते. थ्रीडी कॅमेरा, लाईव्ह नेम डिटेक्शन अल्गोरिदम मुळे दुसर्‍याचा फोटो अथवा व्हिडीओचा वापर करण्यापासून बचाव होतो व ग्राहकाचे खाते सुरक्षित राहते असे रेस्टॉरंटतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment