जगातले पाच छोटे पण सुंदर देश


आपल्या पृथ्वीवर मानवी वस्ती होऊन लक्षावधी वर्षे लोटली असतील. आजमितीला जगात २०० हून अधिक देश अस्तित्वात आहेत. याचाच अर्थ इतक्या संस्कृती, परंपरा येथे नांदत आहेत. येथे अमेरिका, रशिया, चीन सारखे आकाराने प्रचंड मोठे देश जसे आहेत तसेच अगदी छोटे देशही आहेत. त्यातील कांहीचे अस्तित्त्वही आपल्याला माहिती नाही. आज येथे पाच अशाच छोट्या देशांची माहिती देत आहोत. हे देश छोटे जरूर आहेत पण फार सुंदर आहेत. अर्थातच येथे पर्यटकांची फारशी वर्दळ नाही.

द रिपब्लीक ऑफ पलाऊ- जगातील चार छोट्या देशांत याची गणना केली जाते. फिलिपिन्सच्या पूर्वेला असलेले हे एक बेटच आहे तेही ३०० छोट्या छोट्या बेटांचे बनलेले. या देशाची लोकसंख्या आहे २१,३४७. या देशातील वाईल्ड लाइफ अतिशय सुंदर आहे.


सेंट किटस अॅन्ड नेविटस- ही दोन कॅरेबियन बेटे असून यांची लोकसंख्या आहे ५२ हजार. या बेटाचे क्षेत्रफळ १६२ चौरस मैलांचे आहे. या छोट्या बेटावर चीनी उद्योगांची भरमार आहे. या देशाचे नागरिकत्व घेतले तर चांगल्या कमाईची खात्री आहे. येथील नागरिकत्त्व स्वीकारले तर येथे जमीन खरेदी करता येते.

न्यूए- ओशिनिया मधील १६२.४६ चौरस फूटाचा हा भाग. येथील लोकसंख्या आहे अवघी १५००. हा छोटासा देश अतीव सुंदर आहे पण पर्यटकांत तो फारसा लोकप्रिय नाही कारण या देशाचे सारे उत्पन्न परदेशांच्या मेहरबानीवर अवलंबून आहे. या देशाच्या राजधानीत ६०० लोक राहतात. येथे एकच सुपरमार्केट आहे. मात्र या छोट्याशा देशात विमानतळ आहे.


प्रिन्सिपॅलिटी ऑफ हट रिव्हर- ऑस्ट्रेलियाजवळ असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ ४६.६ चौरस मैलांचे आहे. या देशात अवघे ३० लोक राहतात. या देशाला अन्य कोणत्याही देशाने मान्यता दिलेली नाही. मात्र त्यांच्याजवळ त्यांचे स्टँप, पासपोर्ट व चलन आहे.


तुवालू – पॅसिफिक महासागरात हवाई व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये असलेले हे बेट. निसर्गसौंदर्याचे वरदान त्याला लाभले आहे. याचे क्षेत्रफळ आहे १६ चौरस मैल. युनायटेड किंगडममधून हा देश १९७८ साली स्वतंत्र झाला. या देशाची लोकसंख्या आहे १०,९५९. अर्थात हा देश छोटा आहे आणि गरीब ही.

Leave a Comment