फेसबूकचे ‘मेसेंजर लाईट’ भारतात दाखल


नवी दिल्ली – आपल्या फेसबूक मेसेंजर लाईट अॅपचे सोशल मीडियातील दिग्गज फेसबूकने भारतात अनावरण केले. अत्यंत कमी बँडविड्थ आणि निकृष्ट इंटरनेट कनेक्शन असतानाही लोकांना एकमेकांपासून जोडून ठेवण्याच्या उद्देशाने ‘लाईट’ व्हर्जन दाखल करविण्यात आल्याचे फेसबूकने म्हटले आहे. मेसेंजर लाईट हे हल्केफुल्के, साधे आणि वेगवान मोबाईल अॅप आहे. याची निर्मिती खास संथ इंटरनेट जोडणी असणा-या बाजारांना लक्ष्य करून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याअगोदरच्या फुल्ल मेसेंजरमध्ये उपलब्ध असणारे टेक्स्ट्, फोटो, इमोजीसह लिंक्स सारखे अनेक पर्याय लाईटमध्येही उपलब्ध असणार आहेत. तरीही मेसेंजर लाईट फोनमधील फक्त १० एमबी जागा व्यापणार असल्याने इन्स्टॉलेशन आणि वापर वेगाने आणि सुलभतेने शक्य आहे.

Leave a Comment