दूध उकळणे गैर


वर्षानुवर्षे आपण घरात विविध निमित्ताने दूध वापरत आलो आहोत. जेव्हा आपल्या घरीच दुधाळ जनावर पाळले जात होते. तेव्हा धार काढल्यानंतर दूध आधी गरम केले जात होते आणि नंतर ते वापरले जात होते. मात्र आता आपण डेअरची दूध विकत घेत आहोत. असे डेअरीतून आणलेले दूध पुन्हा गरम करून घेण्याची काही गरज नसताना ते गरम केले जाते. आपण दूध पुन्हा गरम करून घेतले पाहिजे असे लोकांना वाटते. परंतु डेअरीचे दूध आणल्यानंतर ते गरम करता कामा नये, असा सल्ला आता या क्षेत्रातले तज्ञ द्यायला लागले आहेत. डेअरीचे दूध पुन्हा गरम केल्याने उलट आपले नुकसान होते असे तज्ञांचे मत आहे.

आपण डेअरीतून जे दूध विकत आणतो ते दूध पाश्‍चराईज करून पॅक करून आपल्याला दिलेले असते. पाश्‍चरायझेशन म्हणजे दूध उच्च तापमानाला गरम करणे आणि एकदम थंड करणे. या प्रक्रियेत दुधातले अनेक जंतू मरून जातात आणि दूध साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. असे पाश्‍चराईज दूध अधिक पोषक असते. कारण त्यातले काही जंतू मेलेले असतात. परंतु आपण पुन्हा त्याला गरम करतो तेव्हा त्यातील पोषण द्रव्यांचा नाश होतो आणि ते कमी पोषक होते. डेअरीतून आणलेले दूध तसेच ४ डिग्री तापमानाला ठेवून दिले तर ते ७ दिवस न नासता आहे तसे राहते. परंतु आपण जेव्हा हेच दूध पुन्हा उकळून घेतो तेव्हा त्याची साठवण क्षमता कमी होते आणि ते लवकरात लवकर नासण्याची शक्यता वाढते. अशा उकळलेल्या दुधाची साठवण क्षमता ते उकळल्यामुळे वाढते हा लोकांचा गैरसमज आहे.

खाद्य आणि पेयांच्या संदर्भात दररोज नवी माहिती प्रकाशात येत असते आणि नवनवे तंत्रज्ञान आपल्यासमोर येत असते आणि अशा नव्या तंत्रांमुळे आपले जुने तंत्र कालबाह्य ठरत असते. आपण वर्षानुवर्षे दूध उकळणे फायद्याचे असते असे समजून आलो आहोत. परंतु हे उकळणे फायद्याचे नसून नुकसानीचे आहे असे आता समोर आले आहे. या संबंधात फूड सेफ्टी हेल्पलाईनचे संस्थापक डॉ. सौरभ अरोरा यांनी उपयुक्त माहिती प्रसारित केली असून डेअरीतून आणलेले दूध पुन्हा उकळण्याची गरज नसल्याचा सल्ला दिला आहे. अशाच प्रकारची माहिती जी. बी. पंत विद्यापीठातील अन्न आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अनिलकुमा यांनीही दिली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment