गुगलच्या नव्या अॅपमुळे तुमचा मोबाइलचा कॅमेरा आता फक्त कॅमेरा राहणार नाही


मुंबई: आपण मोबाईल मध्ये असलेल्या कॅमेराचा उपयोग सध्या फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ रेकोर्ड करण्यासाठी आणि महत्वाचे म्हणजे सेल्फी काढण्यासाठी करतो. पण आता यापूढे जे काही तुम्हाला कॅमेरातून मिळणार आहे ते भन्नाट असेल. कारण गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीच एक घोषणा केली आहे. या घोषणेमुळे मोबाइलच्या कॅमेऱ्याची व्याख्याच पूर्णपणे बदलली जाणार आहे. गुगल एक असे अॅप आणत आहे ज्यामध्ये फोटो काढलेल्या वस्तूची माहिती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. समजा, तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटचा फोटो स्कॅन केला तर तुम्हाला पुढच्या काही वेळात त्याबाबत संपूर्ण माहिती मिळेल.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये या नव्या गुगल अॅपची घोषणा केली आहे. या अॅपचे नाव ‘गुगल लेन्स’ असे असून हे अॅप आगळेवेगळे असणार आहे. कम्प्युटर व्हिजन आणि आर्टिफिशियल इंटेडलिजेंस तंत्रज्ञानाचा वापर या अॅपमध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोन कॅमेऱ्यामध्ये AI तंत्रज्ञान येणार आहे. एवढेच नाही तर, गुगल अॅसिस्टेंटच्या मदतीने गुगल लेन्स यूजर्सला भाषांतर करण्यासही मदत करेल.

गुगल अॅसिस्टेंटसोबतही गुगल लेन्स हे अॅप वापरता येणार आहे. अॅसिस्टेंट अॅपमध्ये नव्याने दिलेल्या ऑप्शन सिलेक्ट करुन यूजर बोलताना देखील लेन्स अॅक्टिव्हेट करु शकतो. त्यामुळे बातचीत सुरु असताना देखील एखाद्या फोटोबाबत जाणून घ्यायचे असेल तर यूजर्स संबंधित फोटो स्कॅन करुन त्याबाबत माहिती मिळवू शकतो. तर तुम्हाला फोटो कशासंबंधी आहे याचीही माहिती देईल. असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment