उद्या बँकांचा एकदिवसीय बंद


नवी दिल्ली – सरकारच्या बँक सुधारणा धोरणाच्याविरोधात आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा या मागणीसाठी उद्या (मंगळवार) बँकिंग क्षेत्रातील नऊ कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधी संस्था, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) एक दिवसीय बंदचे आवाहन केले आहे.

तीन दिवसांच्या सुटीनंतर आज (सोमवार) बँका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बँकांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. जर महत्वाचे काम असेल ते ग्राहकांनी आजच करून घ्यावे. कारण बंदमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.

यूएफबीयूमध्ये बँकिंग क्षेत्रात सहभागी असलेल्या नऊ संघटना- एआयबीइए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू आणि एनओबीसीशी निगडीत सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी, विदेशी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांचे कर्मचारी व अधिकारीही २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होऊन बंद पाळणार आहेत, अशी माहिती ऑल इंडिया बँक एप्लॉईज असोसिएशन (एआयबीइए) चे सरचिटणीस सी. एच. वेंकटाचलम यांनी दिली.

ते म्हणाले, बँकिंग क्षेत्रातील श्रमिक संघ सरकारने सुधारणा संबंधित उचललेल्या पावलांविरोधात दोन दशकांहून अधिक काळापासून लढत आहे. ही धोरणे सामान्य लोक आणि देशाच्या श्रमशक्तिच्या हिताविरोधात आहे. बँकिंग उद्योगात कायमस्वरूपी जागा या आऊटसोर्स करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. हे धोकादायक असल्याचे ते म्हणाले. विविध संघटनांकडून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत योग्य तोडगा न निघाल्याने नाईलाजाने संप करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे वेंकटाचलम यांनी म्हटले. मुख्य श्रम आयुक्तांबरोबर २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत काही तोडगा निघाला नव्हता. बँक व्यवस्थापन सेस्था, इंडियन बँक असोसिएशन श्रमिक सेघटनांच्या मागण्यांवर सहमत झाले नाही. मंगळवारी सेप झाल्यास बँक शाखा आणि कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम होईल, अशा प्रकारच्या सूचना सार्वजनिक क्षेत्रातील बहुतांश बँकांनी आपल्या ग्राहकांना दिली आहे.

Leave a Comment