
मुंबई : भारतात तीन टफपॅड डिव्हाईस पॅनासॉनिक इंडियाने मार्केटमध्ये लॉन्च केला. यामध्ये टफपॅड एफझेड-एफ१ आणि टफपॅड एफझेड-एन१ यांचा समावेश असून त्याचसोबत टफपॅड एफझेड-ए२ टॅबलेट लॉन्च करण्यात आला आहे. क्वालिटी हे बिझनेस क्लाससाठी बनवलेल्या या तिन्ही प्रीमियम डिव्हाईसचे खास वैशिष्ट्य आहे.
पॅनासॉनिकचा लाख मोलाचा स्मार्टफोन भारतात दाखल
अँड्रॉईड डिव्हाईसची किंमत ९९ हजार रुपये, तर विंडोज १० वर आधिरत स्मार्टफोनची किंमत १ लाख ९ हजार रुपये ऐवढी आहे. टॅब्लेटही अँड्रॉईडवर चालणारा असून, त्याची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. मूळ किंमतीशिवाय प्रत्येक डिव्हाईसवर अतिरिक्त टॅक्स आकारला जाईल. पॅनासॉनिक टफपॅड एफझेड-एफ१ आणि एफझेड-एन १ या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स जवळपास सारखे असून दोन्ही स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टम वेगळ्या आहेत.
काय आहेत टफपॅड एफझेड-एफ१, एफझेड-एन१ चे फीचर्स –
या स्मार्टफोनमध्ये ४.४ इंचाचा एचडी डिस्प्ले (७२०×१२८० पिक्सेल रिझॉल्युशन), २.३ गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०१ चिपसेट देण्यात आला असून २ जीबी रॅम, ८ मेगापिक्सेलचा रिअर आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर वाय-फाय, २जी, ३जी, ४जी LTE आणि जीपीएस, एनएफसी, ब्लूटूथ (V 4.1), मायक्रो यूएसबीसारख्या कनेक्टिव्हिटी देण्यात आल्या आहेत.
काय आहेत टफपॅड एफझेड-ए२ चे फीचर्स –
१०.१ इंचाचा डिस्प्ले (१९२०×१२०० पिक्सेल रिझॉल्युशन), १.४४ गीगाहर्ट्झ क्वाड कोअर इंटल एटम एक्स ५-झेड ८५५० प्रोसेसर, ६.० मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टम, ओएस इंटरप्राईज सिक्युरिटी, ४ जीबी रॅम, ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज, ८ मेगापिक्सेलचा रिअर आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसीसारख्या कनेक्टिव्हिटी देण्यात आल्या आहेत.
