येतोय सोनीचा नवा स्मार्टफोन पिकाचू


सोनी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१७ मध्ये त्यांच्या यशस्वी एक्सपिरीया सिरीजमधील पुढचा एक्सपिरीया एक्सए हा फोन सादर करणार आहेच पण त्याचबरोबर नवा स्मार्टफोनही सादर करणार असल्याचे समजते. पिकाचू या नावाने हा फोन लाँच केला जाणार आहे. जीएफएक्स बेंचवर हा फोन लिस्ट केला गेला आहे.

या फोनला ५ इंची फुल एचडी डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, अँड्राईड नगेट ७.० ओएस, २१ एमपीचा रियर तर ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. यापूर्वी सोनी दोन स्मार्टफोन एमडब्ल्यूसी मध्ये सादर करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता व या दोन्ही फोनसाठी होलियो पी २० प्रोसेसर असेल असेही सांगितले जात होते.

Leave a Comment