
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी प्रसिद्ध चायना कंपनी ओप्पोने आपला नवा ओप्पो ए५७ हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला असून ३ जीबी रॅम या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे.
ओप्पोने लाँच ३जीबीवाला नवा स्मार्टफोन
या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाचा एचडी डिस्प्ले, १३ मेगापिक्सलचा रिअर आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात १.४ गीगाहर्टझ् ऑक्टा-कोर क्वॉलकॉम ४३५चा प्रोसेसर, ६.८ मार्शमेलो अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टम त्याचबरोबर ३ जीबी रॅम देण्यात आले आहे. त्याचबरोबर ३२ जीबीची इंटरनल स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. जी १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच ४ जी एलटीई, जीपीआरएस, ब्लूटूथ, यूएसबी अशा कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत. याची किंमत १५ हजार ८०० रुपये ऐवढी ठेवण्यात आली आहे.
