नोटबंदीच्या कालावधीत सापडल्या नाही बनावट नोटा: अर्थमंत्रालय


नवी दिल्ली: लोकलेखा समितीपुढे अर्थमंत्रालयाने अहवाल सादर केला असून ८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१६ या काळात एकदाही बनावट नोटा सापडल्या नसल्यामुळे नोटबंदीचा निर्णय सफल झाल्याचा दावा अर्थमंत्रालयाने या अहवालात केला आहे. केंद्र सरकारकडून बनावट चलनाला आणि दहशतवाद्यांना पुरविण्यात येणाऱ्या निधीला चाप लावणे, हे नोटाबंदीच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले होते, हे उद्धिष्ट सफल झाल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

लोकलेखा समितीपुढे अर्थमंत्रालयाने सादर केलेल्या अहवालातील माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०१६ ते ४ जानेवारी २०१७ या काळात आयकर विभागाने ४७४.३७ कोटी मुल्याच्या नव्या आणि जून्या जप्त केल्या. मात्र, यातील किती पैसा दहशतवादी किंवा गुन्हेगारी टोळ्यांकडून जप्त करण्यात आला, या प्रश्नाचे उत्तर अर्थमंत्रालयाला अजिबात देता आले नाही. दरम्यान, मौल्यवान वस्तुंची जप्ती आणि बेहिशेबी संपत्ती जाहीर करण्याच्या प्रमाणातही गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक वाढ झाल्याचा दावा अर्थमंत्रालयाने केला आहे.

अर्थमंत्रालयानने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर या काळात मौल्यवान वस्तू जप्त केला जाण्याचे प्रमाण १०० तर बेहिशेबी संपत्ती जाहीर करण्याच्या प्रमाणात ५१ टक्क्यांची वाढ झाली असून, नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून कर वसुलीचेही प्रमाण वाढले आहे.

Leave a Comment