नोएडामध्ये दर आठवड्याला होते पिझ्झाची चोरी


आतापर्यंत तुम्ही चोरींच्या अनेक बातम्या वाचल्या असतील मौल्यवान वस्तूंची चोरी होणे काही नवीन नाही पण दिल्लीतील नोएडा पोलिसांसमोर आता नवीन डोकेदुखी समोर आली असून येथे पिझ्झा चोरीचे प्रकरण समोर आले आहेत. या भागात पिझ्झा डिलिव्हरी बॉईजकडून हमखास पिझ्झा चोरून नेण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार दर आठवड्याला पिझ्झा चोरीच्या येथे चार ते पाच घटना घडतात असे म्हटले आहे. एका पिझ्झा डिलिव्हरी बॉईजने या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की हल्ली पिझ्झांची येथे सर्रास चोरी केली जाते. चोरांकडून एका वेळी तीन ते चार पिझ्झा चोरले जातात असेही त्यांनी सांगितले. पण फक्त पिझ्झा आहे म्हणून ते अनेकदा तक्रार करणे टाळतात. त्यामुळे आपले बरेच नुकसान होत असल्याची खंतीही त्यांनी बोलून दाखवली.

तोंडावर रुमाल बांधून किंवा हेल्मेट चोर घालून येतात आणि पिझ्झाची चोरी करून निघून जातात असेही त्यांनी सांगितले. ही चोरी कॉलेज परिसरात अधिक होत असल्याचेही त्यांनी सांगितले. नोएडाच्या सेक्टर ५८ आणि सेक्टर ६२ मध्ये ही चोरी अधिक होते. यापूर्वीही पिझ्झा चोरण्याचे अनेक प्रकार घडायचे पण पिझ्झाची मुळात चोरी होते यावरच कोणी विश्वास ठेवायचे नाही त्यामुळे आम्हालाच ओरडा पडायाचा असेही अनेक डिलिव्हरी बॉईजने सांगितले. पण आता अनेक डिलिव्हरी बॉईजना अशा चोरीचे अनुभव बऱ्याचदा आले आहेत त्यामुळे चोरांपासून आपला पिझ्झा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना खूपच कसरत करावी लागत आहे.

Leave a Comment