आयफोन बंदुकीने पळवले युरोपीय पोलिसांचे याड !


एकीकडे अवघ्या जगाला अॅपलच्या आयफोनने वेड लावले असताना दुसरीकडे युरोपीय पोलिसांचे आयफोन सारख्या दिसणा-या बंदुकीने येड पळवले आहे. हुबेहुब आयफोनसारखी दिसणारी ९ एमएमची बंदुक आली असल्याने युरोपीय पोलिसांना चांगलाच घाम फुटला आहे आणि त्यांनी हायअलर्ट जारी केला आहे.

एका क्लिकवर हुबेहुब आयफोन सारख्या दिसणा-या बंदुकीचे जीवघेण्या शस्त्रात रुपांतर होते. या आयफोन गनची प्रीबुकींगसुद्धा सुरू झाली असून आतापर्यंत १२ हजारांहून अधिक लोकांनी या बंदुकीसाठी प्रीबुकिंग करायला सुरूवात केली आहे. ही बंदुक अमेरिकेत अगदी सहज उपलब्ध होईल पण तिथून ती युरोपीय देशांत देखील सहज निर्यात होईल, त्यामुळे युरोपीय पोलीस सध्या चिंतेत आहेत. ही बंदुक हुबेहूब आयफोन सारखी दिसत असल्याने पोलिसांना ती गोंधळात टाकू शकते त्याचप्रमाणे या बंदुकीचा वापर करून दहशतवादी युरोपात हल्ले देखील करू शकतात त्यामुळे आधीच हायअर्लट जारी करण्यात आला आहे.

युरोपात अशा बंदुका कोणाकडे आहेत का याचाही शोध घेतला जात आहे. बेल्जीयन पोलिसांनी देखील शोधकार्यास सुरूवात केली असून आतापर्यंत त्यांना सुदैवाने अशा बंदुका आढळल्या नाहीत. पण येत्या काळात ही आयफोन बंदुक गंभीर समस्या बनू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment