त्वचेच्या आरोग्यासाठी


आपला चेहरा सुंदर दिसावा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची लोकांवर छाप पडावी अशी कोणाची इच्छा नसेल? प्रत्येकाची तशी इच्छा असते. परंतु त्वचा मुलायम, सुंदर, चमकदार दिसावी यासाठी आवश्यक असणारी पथ्ये पाळण्याच्या बाबतीत फार कमी लोक दक्ष असतात. म्हणून सर्वसामान्य लोकांनी त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक असलेली काही पथ्ये पाळली पाहिजेत. काही लोकांना वारंवार चेहर्‍यावर हात फिरवण्याची सवय असते. वास्तविक पाहता त्याची काही गरज नसते. परंतु चाळा म्हणून लोक अधूनमधून चेहर्‍यावरून हात फिरवतात. त्यामुळे हातावर असलेले काही बॅक्टेरिया चेहर्‍यावर पसरतात आणि चेहर्‍याची त्वचा खराब होते. तेव्हा चेहर्‍यावरून हात फिरवण्याचा चाळा टाळला पाहिजे.

चेहर्‍याचे आरोग्य टिकावे म्हणून लोक बाजारात मिळेल ती क्रीम घेऊन वापरत सुटतात. त्यातल्या त्या ज्या क्रीमचे पॅकिंग चांगले असते आणि ज्या क्रीमला चांगला वास असतो त्याची निवड करण्याकडे लोकांचा कल असतो. तेव्हा वासावरून क्रीम न निवडता त्या क्रीममध्ये काय वापरलेले आहे याचा विचार करून त्याची निवड केली पाहिजे. अशा रितीने चुकीची निवड केली की चेहर्‍यावर विपरित परिणाम होतात. क्रीमची निवड करताना आपल्या चेहर्‍याची त्वचा कशी आहे हे पाहणे आवश्यक आहे. आपली त्वचा कोरडी आहे की तेलकट आहे याचा विचार करूनच क्रीम निवडले पाहिजे.

आपण शारीरिक कष्टाचे काम करतो तेव्हा आपल्याला घाम येतो पण सर्वाधिक घाम चेहर्‍यावर येत असतो. काही लोकांना तर कष्ट न करताच घाम येतो. एखाद्या पार्टीत किंवा समारंभात भडक दिवे लावलेले असतात. त्या दिव्याच्या उष्णतेनेसुध्दा घाम येतो. त्या घामाचा आपण विचार केला पाहिजे. घाम का येतो आणि तो आल्यानंतर काय केले पाहिजे, तो मुळात येऊच नये यासाठी काय केले पाहिजे याबाबत तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. शिवाय क्रीमशिवाय अन्यही काही सौंदर्यप्रसाधने चुकीच्या पध्दतीने वापरली जातात तेही टाळले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment