इंटरनेट स्पीडमध्ये नेपाळ आणि बांगलादेशच्याही मागे भारत

internet
मुंबई – सध्या नोटाबंदीमुळे डिजीटल व्यवहार करण्यावर भर देण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून केले जात आहे. पण असे असले तरी डाऊनलोड स्पीडमध्ये भारताचा जगात ९६ वा क्रमांक लागतो आणि सरासरी बॅण्डविड्थ उपलब्धतेत १०५व्या क्रमांकावर आहोत आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. आपण डाऊनलोड स्पीडमध्ये नेपाळ आणि बांगलादेशच्याही मागे आहोत. मात्र आपण सायबर हल्ल्यांमध्ये वरच्या स्थानावर आहोत. बँकांच्या आणि संवेदनशील, गुपित माहितीवर सहज डल्ला मारला जात आहे.

युझर्स आणि एक्स्पर्ट्स भारतामधील या परिस्थितीमुळे दोघेही चिंतेत असून सायबर एक्स्पर्ट्सच्या म्हणण्याप्रमाणे सायबर व्यवहार करायला भारतातील लोक घाबरतात. कारण यामध्ये हॅकिंग होऊन आपली वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची भीती असते आणि अशावेळी बँक आणि पोलीस मात्र कारवाई करण्याऐवजी हतबलता दाखवत असतात. सायबर एक्स्पर्ट विजय मुखी यांनी आपल्यासारखी व्यक्तिदेखील ऑनलाइन व्यवहार करताना घाबरते, असे सांगितले आहे.

सरकारकडूनच सुरक्षित ऑनलाइन व्यवहार व्हावा यासाठी काही पावले उचलण्याची गरज असल्याचे काही तज्ञांनी सांगितले आहे. सायबर हल्ल्यांविषयी जेव्हा बोलले जाते तेव्हा भारताचा सहावा क्रमांक लागतो. फक्त एका वर्षात सायबर हल्ले दुपटीने वाढले आहेत.

श्रीलंका, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया यांच्यासह अनेक देश बॅण्डविड्थमध्ये आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. दरम्यान डिजीटल व्यवहाराचे सायबर तज्ञांनी स्वागत केले आहे, मात्र आयटीला मिळणा-या पायाभूत सुविधा आणि शिक्षणावरुन नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment