सर्वोच्च न्यायालयाची गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू आणि फेसबुकला नोटीस

supreme-court
नवी दिल्ली – जसजसा इंटरनेटचा वापर वाढत आहे, तसतसे साबयरगुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू आणि फेसबुक सारख्या बड्या कंपन्यांना यातील लैंगिक गुन्ह्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्याच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी साबयरगुन्हे रोखण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेप्रकरणी नोटीस बजावली आहे.

ही नोटीस एम.बी. लोकुर आणि यू.यू.ललित यांच्या खंडपीठाने बजावली असून, याप्रकरणी ९ जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायलयाने बजावले आहेत. सरन्यायाधीश एच.एल दत्तू यांना हैदराबाद येथील प्रज्वला या स्वयंसेवी संस्थेनी पत्र पाठवले होते. तसेच बलात्काराचे दोन व्हिडिओ पेनड्राईव्हवर पाठवत तक्रार केली होती. त्यांची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

सोशल मिडियावर बलात्कारासारख्या गुन्ह्यांचे व्हिडिओ काढून टाकण्याचे गैरप्रकार होत असून, त्याला आळा घालण्यासाठी गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू आणि फेसबुक सारख्या कंपन्यांनी आवश्यक ती पावले उचलावीत असेही या याचिकेत नमुद करण्यात आले आहे.

Leave a Comment