घराला देखणे बनविणारे रंग करणार वीजनिर्मिती

paint
घरात राहणार्‍या प्रत्येकाला आपले घर चांगले दिसावे, येणार्‍यांना प्रसन्न वाटावे असे वाटते. त्यासाठी घराची अनेक प्रकारांनी सजावट केली जाते. त्यात महत्त्वाची भूमिका बजावतात रंग. घराच्या भिंती मस्त रंगांनी रंगविल्या असल्या की घर कसे फ्रेश वाटते. हेच रंग तुमच्या रोजच्या वापरासाठीची वीजनिर्मितीही करू शकले तर? असे पेंटही लवकरच बाजारात येतील कारण वैज्ञानिकांनी सूर्याची उष्णता शोषून त्यापासून वीज निर्मिती करू शकणारे पेंट तयार केले आहेत.

कोरिया इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी व कोरिया इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी या संस्थेतील वैज्ञानिकांनी असे पेंट तयार केले आहेत. ते सोलर एनर्जीला इलेक्ट्रीकल एनर्जीमध्ये रूपांतरीत करू शकतात. यामुळे घराचे सौंदर्य वाढतेच पण वीजबिलाचा खर्चही कमी होतो. कोणत्याही आकाराच्या पृष्ठभागावर हे पेंट लावता येतात. इतकेच नव्हे तर घराप्रमाणेच ते कार, जहाजे यांच्यासाठीही वापरता येतात. उन्हाळ्याच्या दिवसांत घराच्या भितींचे तापमान ४० डिग्रीपर्यंतही जाते. हे पेंट ही उष्णता शोषतात व त्याचे वीजेत रूपांतर करू शकतात. हे संशोधन जर्नल नेचर मध्ये प्रसिद्ध केले गेले आहे.

Leave a Comment