
मुंबई : अॅपलचे सर्वच प्रॉडक्ट्स महागडे असल्यामुळे इच्छा असूनही अनेकांना ते खरेदी करता येत नाही. पण आता ग्राहकांसाठी एक खास ऑफर अॅपल कंपनीने आणली आहे. कॅशबॅक ऑफर आयफोन खरेदी करण्यासाठी देण्यात आली आहे.
आयपॅड प्रो, आयफोन ७ खरेदीसाठी कॅशबॅक ऑफर
अॅपलकडून आयफोन ७, ७ प्लस आणि आयपॅड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी सवलत मिळणार आहे. अॅपलने ही ऑफर सिटी बँकच्या सहकार्याने आणल्याने, ग्राहकांकडे सिटी बँकचे कार्ड असणे आवश्यक असेल. आयपॅड प्रो आणि आयफोन ७ किंवा ७ प्लस एकत्र खरेदी केल्यास २३ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल, अशी ऑफर आहे. अॅपल कंपनी आयपॅड एअर २ सोबत आयफोन ७ किंवा ७ प्लस खरेदी करणाऱ्यांनाही १८ हजार रुपये कॅशबॅक देत आहे. आयपॅड मिनी २ आणि ४ मॉडेल्ससोबत आयफोन ७ किंवा ७ प्लस खरेदी करणाऱ्यांना १७ हजार रुपयांची सूट मिळेल.
अॅपल ग्राहकांसाठी अॅपल स्टोअरमध्ये ५ हजार ९००, २ हजार ९०० आणि २ हजार ८०० रुपयांपर्यंतच्या प्रॉडक्ट्सच्या खरेदीवर सूट देत आहे. मात्र, ग्राहकांना डिव्हाईस एकाच स्टोअरमधून एकाच दिवशी खरेदी करावे लागतील. ही ऑफर ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत असणार आहे.
