
केंद्र सरकारने मोठ्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नव्या ५०० रूपयांच्या नोटांपेक्षाही १०,२० व ५० रूपयांच्या नोटा अधिक छपाई करण्यावर भर दिला असतानाच १ रूपयांच्या नोटाही मोठ्या प्रमाणावर छापण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये ३० वर्षांनंतर प्रथमच १ रूपयांच्या नोटा छपाईचे काम हाती घेण्यात आले असून ते वेगाने केले जात आहे.
एक रूपयांच्या नोटांची छपाई जोरात
खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात १,१०,२०,५० व ५०० रूपयांच्या एकूण ५ कोटी नोटा येथे छापल्या गेल्या त्यात १ रूपयांच्या नोटांची संख्या १० लाख इतकी आहे. त्याचबरोबर १६ नोव्हेंबरला १०० रूपये मूल्याच्या १.९० कोटी नोटा छापण्यात आल्या असून त्या विविध बँकांकडे रवाना केल्या गेल्या आहेत. १ रूपयांच्या नोटांसाठी वेगळी शाई मध्यप्रदेशातील देवास येथून आणली जात असल्याचेही समजते.
