
नवी दिल्ली : आरबीआयने नोटा बदलण्यासाठी झेरॉक्स कॉपीची गरज नसल्याचे सांगितले असल्याचे, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मात्र नोटा बदलण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे ओरिजनल ओळखपत्र बँक कर्मचाऱ्यांना दाखवणे आवश्यक आहे. तसेच त्यासोबत आरबीआयने दिलेला फॉर्म भरणे देखील आवश्यक आहे.
ओळखपत्राच्या झेरॉक्स कॉपीची नोटा बदलण्यासाठी नाही गरज
बँका आतापर्यंत नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी देखील फॉर्मसोबत घेत होते, पण ती आता घेण्याची गरज नाही, फक्त ओरिजनल-मूळ ओळखपत्र तपासून पाहावे असे निर्देश आरबीआयने दिल्याचे इंग्रजी दैनिक टॉईम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.
