
मुंबई – ८ नोव्हेंबरला ५०० आणि १०००च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर ऑनलाइन व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या पेटीएमच्या (डिजिटल पेमेंट कंपनी) वापरात प्रचंड वाढ झाली आहे.
आर्थिक सर्जिकल स्ट्राईकनंतर पेटीएम जोमात
पेटीएमच्या ट्रॅफिकमध्ये या निर्णयामुळे तब्बल ४३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोटा रद्द झाल्याच्या घोषणेनंतर पेटीएमच्या वापरामध्ये तब्बल २५० टक्क्याने वाढ झाली. तर पेटीएमचे अॅप डाऊनलोड करण्याऱ्यांच्या संख्येत २५० टक्क्यांनी वाढ झाली. पेटीएमचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) मधुरा देवडा यांनी सांगितले की, काळा पैसा आणि नकली नोटा बाहेर काढण्यासाठी उचलण्यात आलेले हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारणे घेतलेल्या या निर्णयाला आमचा देखील पाठिंबा आहे. सध्या व्यवहारासाठी पेटीएमचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे. दरम्यान, पेटीएमसोबतच ओला मनी, फ्री चार्ज आणि मोबिक्विक यांच्या (डिजिटल पेमेंट कंपनी) वापरातही प्रचंड वाढ झाली आहे.
