
भारतीय लष्करात तांत्रिक भरती योजना -३७ अंतर्गत ९० तांत्रिक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी दि. ९ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
भारतीय लष्करात ९० तांत्रिक पदांसाठी भरती
या पदांसाठी देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाचे इयत्ता १२ वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदांसाठी उमेदवाराचे किमान वय १६ वर्ष ६ महिने; तर कमाल वय १९ वर्ष ६ महिने असणे आवश्यक आहे. शारीरिक चाचणी, मुलाखत, गटचर्चा याद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या पदांसाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर लॉग इन करून अर्ज दाखल करता येईल.
