
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील सहकारी बँकांवरील निर्बंध उठवले असून राज्याच्या सात शहरांमध्ये राज्य सहकारी बँकांच्या शाखा उघडण्यास परवानगीही दिली आहे.
रिझर्व बँकेने उठवले राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध
राज्यातील सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने मार्च १९९६ पासून ११ प्रकारचे निर्बंध लादले होते. रिझर्व्ह बँकेने ते निर्बंध आता उठवले आहेत. तसेच पुणे, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि धुळे या सात शहरात राज्य सहकारी बँकेच्या शाखा काढण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणामुळे राज्यातील सहकारी बँकांच्या विस्ताराला मदत होणार आहे.
