लोम्बार्गिनीची स्पेशल एडिशन स्पोर्ट कार भारतात सादर

avhio
लक्झरी स्पोर्ट कार साठी प्रसिद्ध असलेल्या इटालियन लोम्बार्गिनीने भारतात त्यांची स्पेशल एडिशन स्पोर्टसकार हुराकेन अॅव्हीओ सादर केली आहे. या कारची एक्सशो रूम किंमत आहे ४ कोटी ५० लाख रूपये. ही लिमिटेड एडिशन कार असल्याने त्याची फक्त २५० युनिट तयार केली जाणार आहेत.

जिनेव्हाच्या ऑटो शोमध्ये ही कार प्रथम सादर केली गेली होती. लोम्बार्गिनीच्या पहिल्या हुराकेन मॉडलप्रमाणेच या कारचे डिझाईन आहे मात्र तिच्या लुक्समध्ये कांही बदल केले गेले आहेत. बोनेटवर स्ट्रीप्स, फ्रंट साईड व स्कर्टस वर कॉन्ट्रास्ट कलर असे हे बदल आहेत. फायटर जेटवरून प्रेरणा घेऊन ही कार बनविली गेली आहे व ती पूर्वीच्या मॉडेलपेक्षा जादा वेगवान आहे. तिला ५२०४ सीसी चे इंजिन दिले गेले असून ती पाच कलर्समध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment