
मुंबई : गणेशभक्तांना कित्येक तास बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे रहावे लागते. मात्र, आता गणेशभक्तांना गणपतीचे दर्शन घेणे सोप झाले आहे.
एकच बस घडवणार मुंबईतील ६ मोठ्या गणपतींचे दर्शन
एमटीडीसी अर्थातच महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने गणेश दर्शनाची खास सोय केली आहे. एका बसमधून मुंबईतील ६ मोठ्या गणपतींचे दर्शन अगदी सहज मिळणार आहे. यात अंधेरीचा राजा, माटुंग्याचा जीएसबी, सिद्धीविनायक, लालबागचा राजा, गणेश गल्ली मुंबईचा राजा आणि गिरगावचा केशवजी नाईक चाळचा गणपती. पण यासाठी गणेशभक्तांना २००१ रुपये मोजावे लागणार आहेत.
