
मुंबई : आई-वडिल दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असल्यामुळे सध्याची कुटुंबव्यवस्था एकटी पडत चालली आहे. आज तर अनेक शाळकरी मुले अगदी लहानपणापासूनच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होतात. मोबाईल आणि सोशल मीडियाचा आजच्या मुलांवर अधिक प्रमाण वाढत आहे. त्यातच आठवी ते दहावीमधील मुले आज मोठ्या प्रमाणात पोर्नोग्राफीकडे वळत आहेत.
आज मोठ्या प्रमाणात पोर्नोग्राफीकडे वळत आहेत विद्यार्थी
समाजावर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओचा परिणाम होत असल्यामुळे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे देखील काही दिवसांपूर्वी समोर आले होते. आज आठवीनंतरच्या मुलांमध्ये पोर्नविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण दिसत आहे. जवळपास ७० टक्के मुले हे पोर्नकडे ओढले जात आहे. एकटेपण हे याला कारणीभूत असणारी एक मोठी समस्या आहे. मुले आपल्या आई-वडिलांपासून लांब होत चालली आहेत. एखाद्या गोष्टीची जर स्पष्टता नसेल तर मुले त्याकडे चुकीच्या पद्धतीकडे वळतात.
