१ रुपयांची नोट तुम्हाला बनवू शकते मालामाल

note
मुंबई : एक रुपयाचे काय महत्त्व आहे तुमच्यासाठी ? तुमच्यासाठी कदाचित नसेल पण एक रुपयांची नोट तुम्हाला करोडपती बनवू शकेल. तुम्हाला ही मस्करी वाटत असेल तर तुम्ही चूक करत आहात. जर तुमच्याकडे जुन्या, दुर्मिळ नोटा असली तर जगात अशा नोटा जमवणारे अनेक शौकीन असतात. अशा लोकांना तुम्ही तुमच्याकडच्या जुन्या, दुर्मिळ नोटा विकू शकतात.

तुम्ही या नोटा ई-कॉमर्स वेबसाईट इबेवर विकू शकता. एक रुपया ते १०००च्या नोटांचा लिलाव तब्बल कोट्यांवधी रुपयांमध्ये होत आहे. ईबेवर १००० रुपयांची नोट तब्बल एक कोटी रुपयांना विकली जात आहे. ईबेवर नोटांची बोली लावली जाते. ज्याची बोली सर्वाधिक असते त्याला ही नोट मिळते.